Crop insurance claim process : नमस्कार शेतकरी मित्रानो, हया वर्षी ऑगस्ट महिना संपत आलेला असला तरी सुध्दा सरासरीपेक्षा 42 टक्के म्हणजे खुपच कमी पासुन पडलेला आहे, दररोज वातावरण जोरदार पाऊस पडण्यासारखेच दिसते, परंतु जोरदार पाऊन काही पडतांना दिसत नाही, नुसता फवारा मारल्यासारखा पाऊस पडत आहे, त्यामुळे पिकांची वाढ पाहिजे तेवढया प्रमाणात झालेली नाही.
पिकांची वाढ खुंटली आहे, यावर्षी अजुनपर्यंत बऱ्यांच नद्या-नाल्याना, छोटा मोठा पुर सुध्दा गेलेला आहे, त्यामुळे विहीरींना,बोअरवेला पाणी आलेले नाही, यामुळे शेतातील पिके करपुन, वाळुन जात आहे, दुष्काळ सदृष्य परिस्थीती निर्माण झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे उपन्नात मोठय प्रमाणात घट होत आहे. त्यात परत शेतीपिके चांगली आली तर मालाला भाव नसतो, माल कमी झालेला असता की, भाव चांगला असतो, अशी परिस्थती जगाच्या पोशींदयावर असते.
त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी प्रत्येक हंगामात आपल्या पिकांचा विमा हा उरविलाचा पाहीजे, त्यामुळे आपल्या पिकांचे नुकसान झाल्यास, विम्याची रक्कम भेटल्यास थोडया-फार प्रमाणात का होईना पण दिलासा मिळतो. crop insurance claim process बाबत जाणुन घेण्यासाठी आपल्या हा लेख पुर्ण वाचावा लागेल. व आवडल्यास इतर शेतकऱ्यांना सुध्दा शेअर करा, कारण इतर शेतकऱ्यांही (crop insurance claim process) ही प्रक्रिया कळु द्या.
हे पण वाचा >>लक्ष्मी मुक्ती योजना महाराष्ट्र ? Laxmi Mukti Yojana Maharashtra
पिकविमा दावा प्रक्रिया ? Agriculture insurance claim process
या वर्षी 2023-2024 महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पिकविमा भरण्यासाठी उपलब्ध करुन दिलेला होता, त्यामुळे महाराष्ट्रातील जास्तीस जास्त शेतकऱ्यांनी या पिकविमा योजनेचा लाभ घेतलेला आहे.
विमा काढलेला असल्यामुळे आपल्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीच्या नियमानुसार शेतकऱ्यांना झालेल्या पिकांची नुकसानी सुचना/तक्रार नोंदवीच लागले, असा नियम आहे.
परंतु शेतकरी बांधवांना पिकविम्याच्या दाव्याबाबत पुरेशे ज्ञान नसल्यामुळे आजही बरेचशे शेतकरी बांधव आपल्या पिकांचा विमा काढलेला असुन, सुध्दा नुकसानीचा सुचना/तक्रार नोंदवत नाही.
ते या आशेवरच असतांना की, विमा काढलेला तर विमा हा भेटेलच, परंतु असे होत नाही, आपण आजही आपण पहातो मागील वर्षी काही शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा विम्याची रक्कम भेटली होती.
परंतु बरेशचे असेही शेतकरी होते, त्यांनी आपल्या पिकांचा पिकविमा तर काढला होता, पण त्यांना त्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नव्हती.
शेतकरी बांधव याच भ्रमात असतात की, एकाला आला तर सर्वांना येईल. त्याच कारण हेच आहे की, आपण आपल्या पिकांच्या नुकसानीचा, एकतर सुचना/तक्रार केलेली नसणार किंवा तक्रार केली असल्यामुळे विमा कर्मचारी/अधिकारी यांच्याकडुन नुकसानीचा अहवाल नामंजुर केला असणार असे होऊ शकते.
शेतकरी बांधवानो आपण जर आपल्या पिकांचा पिकविमा काढलेला असेत तर, वरील समाविष्ट बाबींमुळे जर पिकांचे नुकसान झालेले असल्यास 72 तासाच्या आत आपली तक्रार नोंदवावी लागते.
तक्रार नोंदविल्यानंतर विमा कंपनीचे अधिकारी/कर्मचारी यांच्य मार्फत आपल्या नुकसानग्रस्त प्रकांची पहाणी होते, त्यांनी दिलेल्या अहवालानुसार पिकविमा मंजुर/नामुंजर केला जातो.
त्यामुळे आपल्या पिकांचे नुकसान झालेले असल्यास पिकविमा योजने अंतर्गत खालील प्रमाणे पुढील प्रमाणे समाविष्ट असलेल्या बाबींची तक्रार करु शकता.
अपुरा पाऊस, पावसातील खंड, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट, वीज कोसळणे, वादळ, चक्रीवादळ, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकाच्या उत्पन्नात येणाऱ्या घटिपासून व्यापक स्परुपाचे विमा सरंक्षण या योजनेद्वारे विमा कंपनी/ शासनातर्फे शेतकऱ्यांना दिले जाते.
हे पण वाचा >> ई-पीक पाहणी व्हर्जन 2.0 मध्ये कशी करावी ?
पीक विमा दावा प्रक्रिया महाराष्ट्र ? crop insurance claim process Maharashtra?
त्यामुळे सर्व जालना जिल्हयातील शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की, प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2023-24 चा पीक विमा भरलेला आहे . अशा शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची झालेली नुकसान खालील लिंक 🔗 वापरून नोंदवावी. ही लिंक फक्त जालना जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी आहे. इतर जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी ज्या-त्या पिकविमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधुन तक्रार करण्याबाबत चौकशी करु शकता.
>>> आमच्या दुसऱ्या वेबसाइटला सुध्दा भेट देऊ शकता
crop insurance claim process Maharashtra
जालना जिल्हयात या वर्षी Universal Sompo या विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या पिकांचा पिकविमा उतरविलेला होतो. त्यामुळे फक्त जालना जिल्हयातील शेतकऱ्यांनी या लिंकचा वापर करावा. किंवा इतर जिल्हयात जर Universal Sompo या कंपनीने आपल्या पिकांचा विमा उरविलेला असेल. चेक कसे करावे (विमापावती वर विमा उरविलेल्या कंपनीचे नांव असते) तर ते शेतकरी सुध्दा हयाच लिंकवरुन आपल्या पिकांच्या नुकसानीची सुचना/तक्रार नोंदवु शकता.
तक्रार करण्यासाठी👇 खालील लिंकवर क्लिक करू शकता.
https://login.universalsompo.in/CROP_CLAIM_WEBSITE/
★ लागणारी आववश्यक कागदपत्रे ★
- बँक पासबुक
- आधारकार्ड
- पिक विमा पावती
- सातबारा आणि ८ अ
- रजिष्टर मोबाईल नंबर (पिकविमा भरतांना जो पावतीवर जो मोबाईल नंबर असेल तो)
इतर जिल्हयातही प्रक्रिया हीच राहणार आहे, फक्त विमा कंपनी वेगवेगळी असल्यामुळे त्यांच्या लिंक आजरोजी उपलब्ध होऊ शकल्या नाही.