नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या Blog मध्ये Laxmi Mukti Yojana काय आहे, त्याचे फायदे काय आहे, तोटे काय आहे हे जाणून घेणार आहोत, या योजने बददल आजही बऱ्याच नागरीकांना माहिती नाही. Laxmi Mukti Yojana बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा। कृपया हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका.
Laxmi Mukti Yojana
आपला देश पुरुष प्रधान देश आहे, पुरुष जे सांगेल तेच महिलांना ऐकावे लागते. आजही आपल्या देशात महिलांचे भविष्य पुरुषावरच संपूर्णत: अवलंबुन आहे, त्यात पती निर्व्यसनी निघाला तर अडचण नाही, परंतु पती व्यसनाधीन निघाला तर पत्नी समोर स्वत: बरोबर आपल्या मुलांच्या शिक्षणाची, लग्नाची, मुलांच्या भविष्यची मोठी अडचण निर्माण होते. पतीला दारुचे व्यसन जडलेले असल्यास, तो कोणत्याही प्रकारचे काम न करता सावकारांकडुन सदरील जमीन गहाण ठेऊन व्याजाने पैसे काढुन दिवसरात्र नशेतच राहत असतो. व मुददल व व्याजाची रक्कम न चुकविल्यामुळे बऱ्याचवेळा संपुर्ण शेतजमीन किंवा मालमत्ता विकावी लागते. त्यामुळे त्यांचे परीवार उघडयावर येऊन जिवन असुरक्षीत होते.
एखाद्या व्यक्तीला जुगाराचे व्यसन सुध्दा असु शकते, त्यावेळी सुध्दा दारुच्या नशेपेक्षाही जास्त पैसे तो जुगारात हरत असतो. त्यामुळे कर्जबाजारी होऊन त्याच्याकडील असलेली संपत्ती विकुन भरपाई करावी लागत असते. त्यामुळे त्यांचे संपुर्ण कुटूंब त्रासदायक (disturb) झालेले असते. व त्यांचे भविष्य असुरक्षीत झालेले असते.
Laxmi Mukti Yojana काय आहे ?
Laxmi Mukti Yojana योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली योजना आहे, स्त्रियांचे हक्क सुरक्षित रहावे यादृष्टीने काही सामाजीक संघटनांनी सूचविल्याप्रमाणे शासनाने हा निर्णय सन 1992 ला घेतलेला आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वत: च्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीच्या नावाचा ७/१२ च्या उता-यात स्वतः बरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घ्यावी, अशी स्वेच्छेने विनंती केल्यास, महाराष्ट्र महसूल अधिनियम,१९६६ मधील कलमांच्या अधीन राहून फेरफार नोंदीबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तशी नोंद घेता येते.
या योजनेचा मुख्य हेतु पतीच्या वरील मालमत्ता/जमीनीवर पतीच्या नावाबरोबरच आपल्या पत्नीचे सहहिस्सेदार म्हणुन नांव नोंद करणे हे होय. त्यामुळे महिला सक्षम व सुरक्षीत होणार आहे.
शासन निर्णय पहाण्यासाठी >> येथे क्लिक क
Downloadलक्ष्मी मुक्ती योजेनाचा मुख्य फायदा ?
या योजनेमुळे एखादया व्यक्तीच्या नावावरील मालमत्तेवर/शेतजमीनीवर पत्नीच्या नावाची नोंद सहहिस्सेदार म्हणुन घेता येते. त्यामुळे सदरील व्यक्तीच्या नावावरील मालमत्ता/शेतजमीन व्यसनाधीन व्यक्तीला परस्पर विक्री करता येणार नाही किंवा गहाणही ठेवता येणार नाही. संपत्ती सुरक्षीत राहील. त्यामुळे स्वत: पत्नी बरोबर मुलांच्या उदरनिर्वाह, शिक्षणाची, मुलांच्या लग्नाची, भविष्यची अडचण निर्माण होणार नाही.
हे पण वाचा >> ई-पीक पाहणी व्हर्जन 2.0 मध्ये कशी करावी ?
लक्ष्मी मुक्ती योजेनाचा तोटा ?
या योजनेमुळे एखादया व्यक्तीच्या नावावरील मालमत्तेवर/शेतजमीनीवर पत्नीच्या नावाची नोंद सहहिस्सेदार म्हणुन घेतल्यानंतर सदरील शेजमीन सामाईक दर्शविण्यात येईल. त्यामुळे शासनाचे दुष्काळ व अतिवृष्टी सारख्या अनुदानासाठी एकाच नावावर पती किंवा पत्नीची संमती घेऊनच लाभ घेता येईल, शेतीवर घेण्यासाठी कर्ज एकतर दोघांच्या नावाने घ्यावे लागेल किंवा पती किंवा पत्नीची संमती घेऊन कोणत्याही एकाच्या नावे Crop Loan घेता येईल. शासनाच्या विवीध कृषी सिंचनाच्या अनुदानाच्या योजना जसे- ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे, व इतर सर्वच योजना हया एका व्यक्तीची संमती घेऊनच लाभ घेता येईल. एवढाचा तोटा आहे पण पत्नीचे सहहिस्सेदार असल्यामुळे संपत्ती सुरक्षीत राहणार आहे.
Laxmi Mukti Yojana आवश्यक कागदपत्रे ?
१. रहीवासी दाखला
२. रेशनकार्ड
३. मतदान कार्ड./आधारकार्ड
४. शेताचा ७/१२ सह अर्ज
५ पोलीस पाटील यांचा कायदेशिर पत्नी असल्याचा दाखला.
६. पतीचे संमतीपत्र
Laxmi Mukti Yojana चा अर्ज कोठे करावा ?
लक्ष्मी मुक्ती योजनेसाठी आपल्या गावाचे तलाठी किंवा तहसिलदार यांच्याकडे रितसर अर्ज व प्रतीज्ञापत्र दाखल करुन पत्नीची सहहिस्सेदार म्हणुन नोंद करुन घेऊ शकता.
अर्जाचा नमुना
(कोऱ्या कागदावर टाईप करणे किंवा लिहणे)
विनंती अर्ज,
दिनांक. / /2023
प्रति,
मे.तलाठी साहेब,
तलाठी सजा.———–
ता.———– जि.————
विषय :- लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सहहिस्सेदार म्हणुन नोंद घेणे बाबत.
संदर्भ :- महाराष्ट्र शासन, महसुल व वनविभाग, परिपत्रक क्र.एस-14/216162/प्र.क्र.458/ल 6, दिनांक.25/09/1992
अर्जदार :- श्री. रा.——————— ता.———– जि.———–
महोदय,
वरील संदर्भिय विषयी विनंती अर्ज सादर करतो की, मी नामे. . रा. ता. जि. , येथील रहिवासी असुन, माझ्या नावे मौजे रा. ता. जि. , येथील शिवारात गट नं. मध्ये क्षेत्र हे आर. शेतजमीन आहे.
सदरील शेतजमीनीवर माझी पत्नी नामे. यांना, महाराष्ट्र शासन, महसुल व वनविभाग, परिपत्रक क्र.एस-14/216162/प्र.क्र.458/ल 6, नुसार “लक्ष्मी मुक्ती” मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा 7/12 उताराऱ्यावर पुरुषाबरोबर स्त्रिंयांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबत, या योजनेअंतर्गत वरील संपुर्ण मालमत्तेवर माझ्या पत्नीचे सुध्दा नाव सहहिस्सेदार नोंदविणे आहे.
करीता सदरील संपुर्ण शेतजमीनीवर माझी पत्नी नामे श्रीमती. . यांच्या नावाची नोंद सहहिस्सेदार म्हणुन घेतल्यास, त्यास माझी काहीही हरकत नाही, त्यास माझी संपुर्ण संमती आहे. भविष्यात सदरील शेतजमीनीबाबत मी कोणत्याही प्रकारची तक्रार करणार नाही.
करीता मा.साहेबांना विनंती की, सदरील संमतीपत्राआधारे माझ्या 7/12 वर माझ्या पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणुन घेण्यात यावे ही नम्र विनंती
सोबत :- 1) संमतीपत्र.
2) शासनाचे परिपत्रक
अर्जदार,
श्री. ————————-
प्रतीज्ञापत्राचा नमुना
(100रु च्या स्टॅम्पपेपवर टाईप करणे)
// संमतीपत्र/नाहरकत //
संमतीपत्र लिहुन देणार :- श्री. वय वर्षे धंदा .
रा. ता. जि. .
संमतीपत्र लिहुन घेणार :- श्रीमती. वय वर्षे धंदा .
रा. ता. जि. .
कारणे संमतीपत्र लिहुन देण्यात येते की, मी नामे. . रा. ता. जि. , येथील रहिवासी असुन, माझ्या नावे मौजे रा. ता. जि. , येथील शिवारात गट नं. मध्ये क्षेत्र हे आर. शेतजमीन आहे.
सदरील शेतजमीनीवर संमतीपत्र लिहुन घेणार नामे. यांना, महाराष्ट्र शासन, महसुल व वनविभाग, परिपत्रक क्र.एस-14/216162/प्र.क्र.458/ल 6, नुसार “लक्ष्मी मुक्ती” मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा 7/12 उताराऱ्यावर पुरुषाबरोबर स्त्रिंयांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबत, या योजनेअंतर्गत वरील संपुर्ण मालमत्तेवर माझ्या पत्नीचे सुध्दा नाव सहहिस्सेदार नोंदविणे आहे.
करीता सदरील संपुर्ण शेतजमीनीवर लिहुन घेणार माझी पत्नी नामे श्रीमती. यांच्या नावाची नोंद सहहिस्सेदार म्हणुन घेतल्यास, त्यास माझी काहीही हरकत नाही, त्यास माझी संपुर्ण संमती आहे. भविष्यात सदरील शेतजमीनीबाबत मी कोणत्याही प्रकारची तक्रार करणार नाही.
करीता सदरील संमतीपत्र लिहुन देत आहे मी लिहुन दिलेली माहिती खरी व बरोबर असुन यात काही चुक अथवा खोटे आढळुन आल्यास मी शासनाच्या नियमाप्रमाणे भा.द.वि. कलम 199 व 200 अन्वये शिक्षेस पात्र राहील याची मला जाणीव आहे.
संमतीपत्र लिहुन घेणाऱ्यांची सही, संमतीपत्र लिहुन देणाऱ्यांची सही,
—————- —————-
श्रीमती.———————— श्री.————————
साक्षिदार :-
सही :- ——————— सही :- —————–
1) श्री. ————————————- 2) श्री.—————————————
रा. ता. जि. . रा. ता. जि. .
निष्कर्ष (conclusion)
Laxmi Mukti Yojana योजनेमुळे स्त्रियांचे हक्क सुरक्षित राहणार आहेत. एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वत: च्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीच्या नावाचा ७/१२ च्या उता-यात स्वतः बरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घेतल्यानंतर सदरील व्यक्तीच्या नावावरील मालमत्ता/शेतजमीन व्यसनाधीन व्यक्तीला परस्पर विक्री करता येणार नाही किंवा गहाणही ठेवता येणार नाही. त्यामुळे स्वत: पत्नी बरोबर आपल्या मुलांच्या उदरनिर्वाह, शिक्षणाची, मुलांच्या लग्नाची, भविष्याची अडचण निर्माण होणार नाही. संपत्ती सुरक्षीत राहील.
अर्ज व प्रतिज्ञापत्र डाऊनलोड करण्यासाठी >>